IMF च्या कार्यकारी संचालकपदी RBI चे माजी गव्हर्नर

मुंबई, दि. 29 : RBI चे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाने याबाबतचा आदेश जारी केला. मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने उर्जित पटेल यांच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील कार्यकारी संचालक म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
आदेशात म्हटले आहे की, ‘उर्जित पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल, त्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.’
उर्जित पटेल यांनी केंद्रीय बँकेतील कारकीर्द: 2016 ते 2018 या काळात त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम केले, त्याआधी ते डेप्युटी गव्हर्नर होते. राजीनामा: तीन दशकांमध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा देणारे ते पहिले आरबीआय गव्हर्नर बनले होते.
IMF अनुभव: यापूर्वी त्यांनी 1996-97 मध्ये आयएमएफमध्ये काम केले होते, त्यावेळी ते कर्ज बाजारपेठ, बँकिंग आणि निवृत्ती वेतन सुधारणांबाबत सल्ला देत होते.
सरकारी समित्यांमध्ये योगदान: उर्जित पटेल यांनी अनेक उच्च-स्तरीय समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम केले आहे, ज्यात डायरेक्ट टॅक्सेसवरील केळकर समिती, नागरी आणि संरक्षण निवृत्ती वेतन सुधारणा गट, पंतप्रधान टास्क फोर्स आणि वीज मंत्रालयाच्या तज्ञ गटाचा समावेश आहे.
शिक्षण: आरबीआयच्या वेबसाइटनुसार, त्यांनी येल युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पीएचडी, ऑक्सफर्डमधून एमफिल आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून बीएससीची पदवी घेतली आहे.
IMF बोर्डाबद्दल