माजी मंत्री सुनील केदार यांना दिलासा , शिक्षेला स्थगिती

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे तसेच त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यात त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे हे प्रकरण वीस वर्षांहून अधिक जुने आहे. सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष असताना बँकेचे पैसे एका खासगी व्यावासायिका मार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वापरण्यात आले त्यात या पैशांचा अपहार झाल्याचा आरोप होता. याप्रकरणी केदार यांच्यासह बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना शिक्षा तसेच दंड ठोठावण्यात आला होता. Ex-minister Sunil Kedar relief, suspension of sentence
केदार यांनी दीड लाखांचा दंड भरून आधी सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. आज त्यांना दिलासा मिळाला असून शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांची रद्द झालेली आमदारकी त्यांना पुन्हा बहाल करण्यात येईल , आज त्यांच्या शिक्षेला स्थगिती आणि त्यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ML/KA/PGB
9 Jan 2024