देवगडच्या प्रत्येक आंब्यावर असणार आता युनिक कोड स्टिकर

 देवगडच्या प्रत्येक आंब्यावर असणार आता युनिक कोड स्टिकर

सिंधुदुर्ग, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अस्सल देवगड हापूस आंबा विकत घेताना ग्राहकांची अनेकदा फसवणूकच होते. परप्रांतातील हापूस देवगडचा हापूस सांगून सर्रासपणे विकले जातात. आता मात्र यावर आळा बसणार आहे. देवगड मध्ये पिकवलेल्या प्रत्येक आंब्यावर आता एक युनिक कोड स्टिकर लावण्यात येणार आहे. या स्टिकरच्या माध्यमातून आंब्याची अस्सलता स्पष्ट होणारा आहे.

युनिक कोड वरील स्टिकरचा फोटो 9167668899 या नंबरला व्हाट्सअप केल्यावर त्यावरील कोड मागितला जाईल. यावरून त्या आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार याचे नाव, त्याचे ठिकाण समजणार आहे अशा रीतीने देवगडचा हापूस आंबा प्रत्यक्ष देवगडचाच आहे, याची खात्री पटवून घेता येणार आहे.

पहिल्या टप्यात हे पूर्णपणे शक्य नसले तरी देखील देवगड हापूस आंब्याची ओळख टिकवण्यासाठी जास्तीत जास्त देवगडचे आंबा उत्पादक युनिक कोड स्टिकर चा उपयोग करणार आहेत.देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक किंवा गुजरात मधील आंबा विकला जात असल्याने देवगड आंबा उत्पादकांनी हा निर्णय घेतला आहे.

ML/ML/SL

13 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *