आता बदमाशांची सुटका नाही : दिल्लीत ‘इव्ह टीझिंग स्क्वाड’ तयार होणार

नवी दिल्ली, १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या राजधानीत महिलांचा सुरक्षा प्रश्न नेहमीच चर्चीला जातो. अनेक घटना देखील घडत असतात.यामुळे अशा गोष्टीना आळा घालण्याचा निश्चय दिल्ली सरकारने केला आहे. यासाठी उत्तर प्रदेशच्या ‘अँटी रोमियो स्क्वाड’ प्रमाणेच दिल्लीत ‘इव्ह टीझिंग स्क्वाड’ तयार करण्यात येणार आहे. ज्याचे नाव असेल ‘शिष्टाचार पथक’, असेल.
दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात दोन पथके तयार करण्यात येणार आहेत. ज्यात एसीपी महिला सोबत गुन्हे पथकाच्या प्रमुख असतील.
छेडछाड करणाऱ्या पथकात एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि आठ हवालदार आणि एक हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश असेल.यामध्ये चार महिला पोलीस असतील. यासोबतच तांत्रिक मदतीसाठी स्पेशल युनिटमधील एक पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत राहणार आहे. याशिवाय या पथकाकडे कार आणि दुचाकीही असतील.दिल्लीतील संवेदनशील भागात हे पथक तैनात करण्यात येणार आहे.