सरपंच पदाकरिता तृतीयपंथी उमेदवारही मैदानात…
वाशिम, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच धडपड सुरू आहे. त्यात मानोरा तालुक्यात खापरदरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी तृतीयपंथी ज्ञानेश्वर आडे या उमेदवाराने काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मानोरा तालुक्यातील खापरदरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ७२, सदस्य पदासाठी २७६ अर्ज हे सर्वसाधारणकरिता आरक्षित असल्यामुळे मानोरा तालुक्यातील खापरदरी येथून पहिल्यांदाच करीना या नावाने ओळख असलेल्या ज्ञानेश्वर बळीराम आडे यांनी सरपंच पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, तृतीयपंथी गटामधून सरपंच पदासाठी नामनिर्देश पत्र दाखल करणाऱ्या त्या एकमेव उमेदवार आहेत. दरम्यान तृतीयपंथीय असलेल्या ज्ञानेश्वर आडे उर्फ करीना दीदी यांच्या निवडणूक रिंगणातील प्रवेशामुळे खापरदरी ग्रामपंचायतमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
ML/KA/SL
2 Dec. 2022