इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी

 इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी

मुंबई, दि. १२ : २०२४-२५ सुरुवातीच्या सहामाहीत उत्तर प्रदेशने तेल कंपन्यांना सर्वाधिक इथेनॉल (ethanol)पुरवठा करून देशात प्रथम स्थान मिळवले आहे. जूनअखेर उत्तर प्रदेशने ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राने ६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे.

विशेष म्हणजे, इथेनॉल निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र आघाडीवर असूनही, प्रत्यक्षात पुरवठ्याच्या बाबतीत मात्र तो उत्तर प्रदेशच्या मागे पडला आहे.तमिळनाडू ६० कोटी लिटरचा पुरवठा करत तिसऱ्या स्थानावर आहे.कर्नाटकने ४७ कोटी लिटरचा पुरवठा केला आहे.यंदा कमी क्षमतेने ऊस हंगाम चालल्याने याचा फटका महाराष्ट्रातील उसावर आधारित इथेनॉल प्रकल्पांना बसला आहे.

सध्या देशाची वार्षिक इथेनॉल निर्मिती क्षमता १८२२ कोटी लिटर (8.22 billion litres) इतकी आहे.या क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. महाराष्ट्राची इथेनॉल उत्पादन क्षमता ३९६ कोटी (3.96 billion)लिटर आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश ३३१ कोटी लिटर क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर,तर कर्नाटक २७० कोटी लिटर क्षमतेसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.उत्तर प्रदेशमध्ये असलेली उत्पादन क्षमता आणि प्रत्यक्षात झालेला पुरवठा यात कमी तफावत आहे. याउलट, महाराष्ट्राची क्षमता सर्वाधिक असूनही, प्रत्यक्षात मात्र क्षमतेच्या तुलनेत इथेनॉल निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे इथेनॉल पुरवठा घटला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *