“सनातन दहशतवाद”? – युवासेनेचा तुफान संताप!

भाईंदर दि २ :– कॉंग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या “भगवा नाही, सनातन दहशतवाद म्हणा” या अत्यंत आक्षेपार्ह व हिंदू धर्माच्या भावनांवर घाव घालणाऱ्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याचा निषेध करत आज मिरा-भाईंदरमध्ये युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट सर्कल येथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदर युवासेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार निषेध आंदोलन केले.
यावेळी चव्हाण यांच्या प्रतिमा आणि बॅनर्स जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी युवासेनेने जोरदार घोषणाबाजी करत, “भगवा आमचा अभिमान आहे”, “सनातन धर्माचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, “पृथ्वीराज चव्हाण माफी मागा” अशा घोषणा दिल्या.
युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले विधान मागे घेत जनतेची माफी मागितली नाही, तर यापुढे मिरा-भाईंदर सह संपूर्ण महाराष्ट्रभर युवासेनेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
त्याचसोबत ‘पृथ्वीराज बाबां”नी माफी मागितली नाही तर मिरा-भाईंदर युवासेना समस्त वारकरी समुदायाला घेऊन चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेर भजन – किर्तन करत हिंदू सनातन काय आहे, याचे धडे देईल. असा तीव्र इशारा युवासेनेने दिला आहे. हिंदू धर्म, भगवा आणि सनातन संस्कृतीवर होत असलेल्या अशा पद्धतीच्या हल्ल्यांना युवासेना कधीच मुकन बसू देणार नाही. संपूर्ण हिंदू समाजाच्या अस्मितेचा हा अपमान आहे, आणि त्यास युवासेना रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देईल.
ML/ML/SL