वन्यजीव सोयरे मधील चिमुकल्यानी बनविल्या पर्यावरण पूरक राख्या
बुलडाणा, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे परिवारातील चिमुकल्या सदस्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनविल्या आहेत. 30 ऑगष्टला सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होत असतांना पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करूया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया या उद्देशाने त्यांनी हे केले आहे.
बाजारात काही वर्षापासून पारंपरिक राखी बरोबर आधुनिक तसेच चायनीज राख्या विकल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीव सोयरे परिवारातील चिमुकल्यानी पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या असून या राख्या तयार करण्यासाठी तुळशी, फाफड़ा आणि कांचन यांच्या बिया वापरल्या आहेत. या राखीच्या एका बाजूला पर्यावरण पूरक राखी लिहिण्यात आले असून दुसऱ्या बाजूला वन्यजीव सोयरेचा लोगो ज्यात मोगलीच चित्र छापले आहे.
रक्षाबंधनानंतर या राखीच्या असलेल्या बिया एखाद्या कुंडीत अथवा मातीत पेरल्यानंतर त्याला सतत पाणी घातल्यास बीजांकुरण होईल आणि नवी रोपे तयार होतील. यातून निसर्ग संवर्धना बरोबरच आपलं आयुष्य अधिक तंदुरुस्त बनवता येईल. निसर्ग पूरक रक्षा बंधनाचा धागा अधिक बळकट होईल. ही राखी पर्यावरण पूरक असणार आहे. ज्यामध्ये प्लास्टिकचा कोठेही वापर केलेला नाही.
ML/KA/SL
29 Aug 2023