कौमी सप्ताह दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यावरण संवर्धन

 कौमी सप्ताह दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यावरण संवर्धन

महाराष्ट्र, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संत तुकारामनगर येथे कौमी सप्ताह दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यावरणाचे संवर्धन केले. यानिमित्त ‘माझी वसुंधरा’ हा उपक्रम घेण्यात आला.
सूर्यकांत मुळे म्हणाले, ‘‘जागतिक पर्यावरण दिन हा पाच जूनलाच केला जातो असे नाही. हवेचे प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, जागतिक तापमान वाढ यासाठी जनजागृती पर्यावरण हे व्यासपीठ आहे. याचा मुख्य उद्देश पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण हाच आहे. नागरीकांनी जगण्यासाठी, रस्ता वाढीसाठी वृक्षतोड केली आहे. प्रत्येकाने ठरवले पाहिजे माझ्यामुळे वृक्षतोड, प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
जगामध्ये पृथ्वीचे तापमान वाढत आहे. दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. नद्यांच्या प्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येऊन त्यांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत चालला आहे. कृषी क्षेत्रावर परिणाम होत चालला आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून माझी वसुंधरा पर्यावरण राबवण्याचे सक्तीचे करावे, यासाठी ग्रामविकास व नगर विकास विभागाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे अण्णा जोगदंड यांनी केले. कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावून जगवले पाहिजेत. फक्त पर्यावरण दिवशी वृक्षारोपणाचा देखावा न करता वर्षभर झाडे लावून जगवली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
रोहिणी मेश्राम यांनी सिमेंटच्या जंगलामुळे सूर्य आग ओकतोय, पशू-पक्षी नष्ट होताना दिसत आहेत, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आवाहन केले. या वेळी कामगार कवी श्यामराव सरकाळे यांनी इंद्रायणी काठी, माझ्यामध्ये होणाऱ्या प्रदूषणासाठी या अशी आर्त हाक दिली. या वेळी शैलेजा आवडे, कामगार प्रतिनिधी किशोर पुजारी, गोरखनाथ वाघमारे, नवनाथ कदम, गुंगा क्षीरसागर आदी उपस्थित होते. केंद्र संचालक अनिल कारळे यांनी आभार मानले. Environmental conservation through various activities on the occasion of Koumi Week

ML/KA/PGB
27 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *