‘पर्यावरणपूरक-प्रदूषण मुक्त’ होळी
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एमआयडीसी निवासी भागात शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यावर्षी होळी पौर्णिमा ही गाईचे शेणापासून बनविलेल्या लाकडापासून म्हणजेच गोकाष्ट याची पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त होळी साजरी करण्यात आली. एमआयडीसी मध्ये रासायनिक आणि इतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याने वृक्षांवर आघात न करता आणि त्यात लाकूड जाळून प्रदूषणाची आणखी भर न घालता जर अशा प्रकारे होळीचा सण साजरा केल्यास एक चांगला संदेश/पर्याय आपण जनतेसमोर देऊ शकतो असे शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि सभासद कार्यकर्त्यांना वाटल्याने त्यांनी हा पर्यावरणपूरक प्रदूषण मुक्त होळीचा निर्णय घेतला होता.
‘Environment-Friendly-Pollution Free’ Holi
PGB/ML/PGB
25 March 2024