जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मॅरेथाॅन ….
ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ५ जून हा दिवस सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोमवारी “सेव्ह अर्थ मॅरेथाॅन” व “हेल्थ अँड वेलनेस इको सिस्टीम” यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ ते ९ या वेळेत डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह चौकात ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. या सामाजिक संस्थांचे संस्थापक सिध्दार्थ नगराळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. पहिल्या १५० धावपटूंना संस्थेतर्फे टी-शर्ट दिले जाणार आहे. या मॅरेथॉन मध्ये पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या मॅरेथॉनचा मार्ग खालील प्रमाणे असेलडॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौक- उपवन रोड- बेथनी हॉस्पिटल- गांधीनगर-वसंत विहार- चौक.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीनोंदणी सुरू झालेली आहे. इच्छूक पर्यावरण प्रेमींनी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
ML/KA/PGB 4 Jun 2023