हवामान बदलामुळे ४५ हजारहून अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

 हवामान बदलामुळे ४५ हजारहून अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान बदलासह मानवी भौतिक विकासासाठी केल्या कित्येत वर्षांपासून निसर्गचक्रात लुरु असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातून ४५ हजार हून अधिक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविषयक एका आंतरराष्ट्रीय संस्थेने प्राणी आणि वनस्पतींबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) नुकतीच धोक्यात आलेल्या प्रजातींची ताजी यादी जाहीर केली आहे. गेले काही वर्षे ही यादी जाहीर केली जाते.

‘कोपियापोआ कॅक्टी’ या नामशेष होणाऱ्या शोभेच्या वनस्पतीबाबतही काही निरीक्षणे नोंदविण्यात आली असून, या वनस्पतीचा बेकायदा व्यापार चालला असून, सोशल मीडियाद्वारे त्याबाबत प्रसिद्धी केली जाते, असे आढळले आहे. या प्रजातींपैकी ८२ टक्के प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०१३ मध्ये ही संख्या ५५ टक्के होती, असे अहवालात म्हटले आहे.

धोक्यात असलेले प्राणी, वनस्पती यांच्याबद्धल यात माहिती दिली जाते. या यादीमध्ये आता १,६३,०४० प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे सहा हजारांनी वाढ झाली आहे. चिलीच्या अटाकामा किनारपट्टीवरील वाळवंटातील कोपियापोआ कॅक्टी, बोर्नियन हत्ती आणि ग्रॅन कॅनरिया महाकाय सरडे या सजीवांना धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती ‘आययूसीएन’ने दिली आहे.

SL/ML/SL

2 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *