ठाणे घोडबंदर रोडवर २ आठवडे अवजड वाहनांना प्रवेशबंदी

 ठाणे घोडबंदर रोडवर २ आठवडे अवजड वाहनांना प्रवेशबंदी

ठाणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह घोडबंदर रोड हा ठाणे शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्ता मानला जातो. हा रस्ता ठाण्यातील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेला भाईंदरमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडतो. या रस्ता प्रचंड वाहन कोंडीसाठी नेहमीच चर्चेत असतो. या वाहतूक कोंडीला प्रामुख्याने कारणीभूत ठरते ती या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहनांची वर्दळ. अशा या अतीव्यस्त घोडबंदर रोड येथील गायमुख घाट शुक्रवारपासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे म्हणजे ७ जूनपर्यंत अवजड वाहनांना या मार्गावरून बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.

घोडबंदर मार्गावर बंदी काळात हलक्या वाहनांची वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे या दुरुस्ती कामादरम्यान घोडबंदर, मुंबई-अहमदाबाद मार्गावर मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. ठाणे शहराला मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेतले आहे.त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेने घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. ६ जूनपर्यंत ही प्रवेशबंदी असेल.

पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे घाटातील वाहतूक संथ गतीने होते. त्याचा फटका वाहनचालकांना बसतो.या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे.या पार्श्‍वभूमीवर मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवडाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूरफाटा मार्गे आणि कशेळी, अंजुरफाटा मार्गे जातील.

SL/ML/SL

26 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *