पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अभियंत्याला जन्मठेप
नवी दिल्ली, दि. १ :
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा ब्राह्मोस एअरोस्पेस कंपनीचा अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याला हेरगिरी प्रकरणात 2018 साली लखनऊ ATS ने नागपुरातून अटक केली होती. आधी न्यायालयाने अग्रवालला जन्मठेप शिक्षा सुनावली होती, आज हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणी मध्ये निशांत अग्रवालला दिलासा मिळाला असून जन्मठेप रद्द करत तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
-नागपूर खंडपीठामध्ये दाखल केलेल्या जन्मठेप शिक्षेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली न्यायालयाने शिक्षा रद्द करत तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. नागपूर खंडपीठात न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर आणि प्रवीण पाटील यांचे न्यायपीठात सूनवणी पार पडली यात तीन वर्षांचा सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे. निशांत अग्रवाल हा नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार (उत्तराखंड) येथील मूळ रहिवासी आहे.
तो भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीच्या नागपूर प्रकल्पामध्ये सिस्टम इंजिनिअर पदावर कार्यरत होता. त्याला जन्मठेप 14 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात तो न्यायालयात गेला होता.आज त्याला न्यायालयातून शिक्षा कमी केल्यानं दिलासा मिळाला आहे.
SL/ML/SL