अभियंता कर्पे आणि लिपिक जऱ्हाड इंदुलकर पुरस्काराने सन्मानित

 अभियंता कर्पे आणि लिपिक जऱ्हाड इंदुलकर पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालय, मुंबई इथे कार्यरत असलेले अहमदनगर जिल्हयाचे सुपुत्र अभियंता प्रणव बबनराव कर्पे आणि लिपिक विठ्ठल जऱ्हाड हे अधिकारी स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.

नगररचना दिनाचे औचित्य साधून स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रणव कर्पे हे मूळ संगमनेर जिल्हयातील पिंपळगाव कोझीरा गावचे रहिवाशी असून त्यांचे वडील प्रा.बबनराव किसन कर्पे हे अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये शास्त्र शाखेचे प्राध्यापक पदावरुन सेवानिवृत्त् झाले. त्यांच्या दिवंगत मातोश्री पुष्पा बबन कर्पे संस्कृत , मराठी या विषयाच्या प्राध्यापिका होत्या.

प्रणव कर्पे यांनी एम.टेक पर्यत शिक्षण घेतले असून त्यांनी अहमदनगर महानगरपालिकेत नगररचना विभागात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी नगररचना विभागात नगररचनाकार या पदावर कामे केली असून सध्या ते मंत्रालयातील नगर विकास विभागात अवर सचिव पदावर कर्यरत आहेत. तसेच चेडे चांदगाव ता.शेवगाव येथील मूळ निवासी असलेले विठ्ठल जऱ्हाड यांनी बी.ए डी.एड पर्यंत शिक्षण घेऊन ते नगर विकास विभागात कार्यरत आहेत.

प्रणव कर्पे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या अभियंता आणि कर्मचारी यांनी खालील विषयावर विशेष काम करुन आपल्या कामाचा वेगळा ठसा उमठवला. कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी ह्या तालुक्यातील असलेले अभयारण्य आणि राधानगरी धरण तसेच त्याच्या सभोवतालच्या क्षेत्राचा (८४ गावे) इको-पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने कलम ४० (१) अन्वये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याची कार्यवाही त्यांच्या कार्यासनाने केल्यामुळे पर्यावरण आणि पर्यटन संवर्धनास चालना मिळत आहे.

• नविन महाबळेश्वर गिरीस्थान क्षेत्र विकसित करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील १७७ गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली.

  • महिला दिनांचे औचित्य साधून राज्याकरिता मंजूर UDCPR मध्ये महिलांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक-निमसार्वजनिक आणि इतर संलग्न वापराच्या इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची (‘Ladies Room’) तरतूद करुन तात्काळ अंमलबजावणी होण्याकरिता कलम १५४ अन्वये निदेश पारित केल्यामुळे महिलांच्या समस्या दुर होण्यास मोलाची मदत होणार आहे.

• राज्यातील सर्व औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकक्षेत येणा-या क्षेत्राकरिता “सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीस” शासनाने दि.०५.०७.२०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे मंजूरी दिली आहे.

• उद्योग विभागाने राज्यासाठी नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरण – २०२३ जाहीर केले असून सदर धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या सर्व विकास नियंत्रण नियमावलींमध्ये करण्याच्या उद्देशाने आवश्यक ती कार्यवाही केल्यामुळे उद्योग वाढीसाठी मोलाची मदत होणार आहे.

या कार्यासनाने केलेल्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करुन स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मानित केले.

ML/KA/PGB
16 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *