राज्यातील छोट्या , मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे याला यापुढे प्राधान्य

 राज्यातील छोट्या , मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे याला यापुढे प्राधान्य

ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात बाहेरून उद्योग यायलाच हवेत मात्र त्याआधी इथे असणाऱ्या लघू , मध्यम उद्योगांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देत त्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती कशी होईल याकडे सरकार यापुढे गांभीर्याने पाहिल अशी खात्री राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज ठाण्यात दिली.Encouraging small and medium enterprises in the state is now a priority

लक्षावेध ने आयोजित केलेल्या बिझिनेस जत्रा या उद्योजक मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याआधीच्या सरकारला उद्योगांशी बोलायला , भेटायला आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायला का वेळ नव्हता याबद्दल आपण बोलणार नाही मात्र यापुढे असे उद्योजक मेळाव्यातून अधिक उद्योजक तयार व्हावेत आणि त्यासाठी राज्याचे उद्योग खाते एक पाऊल पुढे असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

त्याआधी बोलताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महा विकास आघाडी सरकारच्या काळात उद्योजकांचे तीन हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान रखडले होते, अनेक वेळा मागणी करूनही ते दिले नाही, त्यामागे काही मिळण्याची अपेक्षा त्यांनी बाळगली होती असे स्पष्टपणे सांगितले. हा राजकीय आरोप नसून आपला अनुभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात आजपासून सुरु झालेल्या या तीन दिवसीय बिझिनेस जत्रेत छोटे , मध्यम उद्योजक , बँका , वित्तीय संस्था आणि संबधित संस्था यांची दालने असून त्यातून काही कोटींची उलाढाल होईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

ML/KA/PGB
11 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *