भावनिक बुद्धिमत्ता : समज आणि उमज – मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे
MMC – वर्तमान / MMC – Vartaman च्या या नवीन एपिसोडमध्ये आपण प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आणि माइंडफुलनेस टिचर डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी संवाद साधला आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, स्पर्धेत टिकून राहून स्वतःला सिद्ध करण्यासाठी बुद्ध्यांक (IQ) चांगला असणं आवश्यक आहे त्याच बरोबर भावनांक म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता देखील महत्त्वाची आहे. ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? ती कशी विकसित होते? प्रयत्नपू्र्वक वाढवता येते का? व्यक्ती आणि समाजाची भावनिक समज, उमज अधिक प्रगल्भ होण्यासाठी काय करता येईल? अशा विविध मुद्द्यांवर डॉ. बर्वे यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. एपिसोड आवडल्यास Like करा, Share करा. MMC -Vartaman Youtube चॅनलला सबस्क्राईब करा.