धडा शिकवण्यासाठी हटवली या देशाची उच्चायुक्त सुरक्षा
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्यानंतर विविध स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात येत होता. याप्रकरणी भारत सरकारने कारवाईची मागणी केली होती. मात्र, ब्रिटिश सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.
दरम्यान आता भारतानेही ब्रिटिशांना जशास तसं उत्तर देण्यास सुरूवात केली असून केंद्र सरकारने ब्रिटीश दूतावासाबाहेरील सुरक्षेत कपात केली आहे.
भारत सरकारने दिल्लीतील २ राजजी मार्गावर स्थित ब्रिटिश दूतावासासमोरील सुरक्षा काढून घेतली आहे. यापूर्वी या इमारतींसमोर बॅरिकेड्ससह दोन बंदुकधारी पोलीस कर्मचारी तैनात होते. मात्र, त्यांना आता हटविण्यात आले आहे. विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या अन्य देशांच्या दूतावासांसमोर सुरक्षा रक्षक तैनात आहे.
SL/KA/SL
22 March 2023