कुणबी समाजाच्या ३२ संघटनांचा सरकार विरोधात एल्गार

कुणबी समाजाच्या ३२ संघटनांचा सरकार विरोधात एल्गार
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासनाच्या अध्यादेशातील सगेसोयरे, सजातीय आणि गणगोत या दोन शब्दांमुळे कोकणातील कुणबी समाज संतप्त झाला असून कोकणातील तब्बल ३२ कुणबी समाज संघटना एकत्र येऊन कुणबी एकीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांची निवड करण्यात आली असून कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील कार्याध्यक्ष तर डॉ. प्रकाश भांगरथ सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे, रत्नागिरी ,रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असणाऱ्या कुणबी समाजामध्ये सरकार विरोधी अस्वस्थता असून आरक्षणाच्या मुद्द्यावर आता कुणबी समाजातील सर्व समाज संघटना, राजकीय संघटना या एका छताखाली एकत्र येत सरकारने २० तारखेला बोलावलेल्या अधिवेशनाच्या विरोधात आता या सर्व संघटनांनी एल्गार पुकारला आहे.
मराठा जातीला सरसकट सर्वांनाच कुणब्यांचे जातप्रमाणपत्र व जातपडताळणी प्रमाणपत्र देता यावे म्हणून विद्यमान अधिनियम नियमात बदल करून ‘सगेसोयरे’ व ‘गणगोत’ या बोलीभाषेतील मोघम अशास्त्रीय शब्दांचा अंतर्भाव करणाऱ्या अधिसूचनेच्या मसुद्यावर हरकत-पत्रे पाठविणे कृती कार्यक्रम १६ तारखे नंतर मुदतवाढ मिळावी अशी मागणी संभाजी काजरेकर यांनी केली आहे.
मराठा अध्यक्ष व सदस्यांचा भरणा असलेल्या आयोगाकडून मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या बोगस सर्वेक्षणाला आव्हान देणेसाठी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्या. शिंदे समितीच्या माध्यमातून ५७ लाख बोगस कुणबी नोंदी सापडल्या. त्याच्या आधारे मराठ्यांना चूकीच्या पद्धतीने कुणबी जातप्रमाण पत्र दिली जात आहेत. त्याला विरोध करणेसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी अध्यक्ष अशोक दादा वालम, कार्याध्यक्ष विश्वनाथ पाटील व सरचिटणीस डॉक्टर प्रकाश भांगरथ, कुणबी समाजोन्नती संघटनेचे अध्यक्ष भूषण बरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी
हे उपस्थित होते .
Elgar of 32 organizations of Kunbi community against the government
ML/KA/PGB
15 Feb 2024