ऐकाव ते नवलच- ओरिसात हत्तींचा कळप देशी दारू पिऊन मद्यधुंद

 ऐकाव ते नवलच- ओरिसात हत्तींचा कळप देशी दारू पिऊन मद्यधुंद

भुवनेश्वर,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हत्ती या अवाढव्य पण बुद्धीमान प्राण्याच्या विविध सवयीबद्दल माणसाला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. रागावल्यावर सैरभर पळत लोकांना बेभानपणे तुडवणारा हत्ती ते शहरातील गर्दीतून डौलदार पावले टाकीत शांतपणे वाटचाल करणारा, लहान मुलांना पाठीवर नेणारा, केळी खाणारा हत्ती  ही कमालीची विरुद्ध रुपे  आपण पाहीली आहेत.  या हत्तींच्या कळपाने आज ओरिसामध्ये एक अजब कारभार केला आहे. 24 हत्तींनी चक्क देशी दारू पिऊन ताणून दिली आहे.  Elephants drinking country liquor Odisha

 ओडिशातील केओंझार जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सुस्तावलेल्या हत्तींना गावकऱ्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. पण, हत्ती काही उठले नाही. अखेर गावकऱ्यांनी ढोल ताशा वाजवत हत्तींना जागे केले. यानंतर हत्ती उठले आणि जंगलात निघून गेले.

ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यातील शिलीपदा गावातील लोकांनी पाटणा वन परिक्षेत्राच्या जंगलात महुआची फुले मोठ्या कुंड्यांमध्ये पाण्यात भिजवली होती. यापासून वाईन बनवली जाणार होती. महुआच्या झाडाची फुले एक अल्कोहोलयुक्त पेय तयार करण्यासाठी आंबवले जातात. ज्याला महुआ देखील म्हणतात. सकाळी 6 वाजता गावकरी महुआ बनवण्यासाठी जंगलात पोहोचले. तेव्हा त्यांना तिथे 24 हत्ती झोपलेले दिसले.

सर्व भांडी तुटलेली होती आणि आंबवलेले पाणी गायब होते. हे पाहताच, हत्ती हे नशेचे पाणी पिऊन झोपल्याचे गावकऱ्यांना समजले. ग्रामस्थांनी हत्तींना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काही उठले नाहीत. यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. महुआ प्यायल्यामुळे हत्ती सुस्तावल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

 SL/KA/SL

10 Nov 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *