जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने हत्तिणीचा जागीच मृत्यू…
गडचिरोली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतात जंगली वन्य प्राणी येवू नये, यासाठी जिवंत (लो टेन्शन वायर)विद्युत तार शेताभोवताली पसरविलेल्या जाळ्याला स्पर्श झाल्याने एका हत्तीणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
काल रात्री हत्तीच्या कळपाने त्याच शेतात जाण्याचा प्रयत्न करीत असतांना जिवंत विद्युत ताराचां स्पर्श झाल्याने अंदाजे २० वर्ष वयाच्या मादी जातीच्या हत्तीचा जागीच तडफडून मृत्यू झाला..
शेतात विद्युत तारा लावलेल्या आरोपीला वनविभागाने ताब्यात घेतले असून आरोपीचे नाव रघुनाथ नारनवरे(६३) असे आहे. या घटनेचा अधिक तपास वडसाचे उपवनसंरक्षक पोहोचले असून वनविभागाची पथकामार्फत पुढील तपास आणि कारवाई सुरू झाली आहे. कुरखेडा तालुक्यातील वाढोना गावातील शेत शिवारातील ही घटना आहे.
SL/KA/SL
31 Dec. 2023