व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आता इलेक्ट्रिक जिप्सींचा पर्याय

 व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आता इलेक्ट्रिक जिप्सींचा पर्याय

चंद्रपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आता इलेक्ट्रिक जिप्सींचा पर्याय उपलब्ध झालाय. सध्या ताडोबाच्या मोहर्ली, मामला आणि कोलारा या ३ प्रवेशद्वारांवर या जिप्सी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ताडोबात पेट्रोल वर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात मात्र आता सफारीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक जिप्सी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे. सोबतच या जिप्सी अजिबात आवाज करत नसल्याने सफारी दरम्यान पशु-पक्ष्यांना होणारा त्रास कमी झालाय आणि पर्यटकांना त्यामुळे प्राणी आणि जंगल अगदी जवळून पाहता येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या जिप्सींमुळे जिप्सीचालकांच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे. ताडोबाच्या एका सफारीसाठी जिप्सी चालकांना किमान ७०० ते ८०० रुपये खर्च येतो पण आता इलेक्ट्रिक जिप्सी मुळे फक्त 55 रुपयांच्या चार्जिंग मध्ये एक सफारी पूर्ण करता येते. त्यामुळे जिप्सी चालक आणि पर्यटक इलेक्ट्रिक जिप्सींना जास्त प्रमाणात परवानगी देण्याची मागणी करताहेत.

ML/KA/SL

5 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *