नागपुरात सुरु होतेय देशातील पहिली विजेवरील एलिवेटेड बस सेवा
नागपूर, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :
नागपुरात देशातील पहिली विजेवर चालणारी एलिवेटेड बस सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरातील रिंग रोडवर पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत ही खास बस सेवा चालवली जाईल. त्यासाठी टाटा आणि स्कोडा या नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून ही खास बस तयार केली जात असून ती बस 18 मीटर लांब राहणार आहे.
या खास बसमध्ये प्रवाशांना विमानासारख्या सर्व सोयी उपलब्ध राहील, असे ही गडकरी म्हणाले.विशेष म्हणजे एसटी किंवा महापालिकेकडून डिझेलवर चालवल्या जाणाऱ्या बस सेवेपेक्षा विजेवर चालणाऱ्या या बस सेवेचे दर 30 टक्क्यांनी कमी राहतील. असा दावा ही गडकरींनी केला आहे. एलिव्हेटेड मार्गावर विजेवर चालणाऱ्या बस सेवेचा हा देशातील पहिलाच प्रयोग राहील आणि त्याची अंमलबजावणी नागपुरातील अत्यंत वर्दळीच्या रिंग रोडवर 50 किलोमीटर अंतरापर्यंत केली जाईल अशी माहिती ही नितीन गडकरींनी दिली.
आज नागपुरात नैसर्गिक शेती या पुस्तकाचे विमोचन गडकरी यांच्या हस्ते होत असून ऍग्रो व्हिजन शेतकरी भावनाचे भूमिपूजनही पार पडला. यावेळी या कार्यक्रमात ते बोलत होते. देशात इथेनॉल वर आधारित पेट्रोल पंप सुरू होत आहे. देशातील सर्व मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना मी इथेनॉल चालणारे वाहन उत्पादन करण्यास लावले आहे. शेतकरी खाद्य पिकांच्या उत्पादन करून श्रीमंत होऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांनी बायोफ्यूल तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादनात वाटा द्यावा, त्याच्यातून ते श्रीमंत होऊ शकतात. असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केला.
SL/ ML/SL
25 August 2024