विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक अटळ

 विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक अटळ

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज अर्ज माघारीची मुदत संपली तोवर कोणीही माघार न घेतल्याने येत्या बारा तारखेला निवडणूक अटळ झाली आहे. अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात असून आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवारची माघार झाली नाही. यामुळे बारा तारखेला मतदान प्रक्रिया अटळ आहे. २८८ विधानसभा सदस्यांच्या सदनात सध्या २७४ सदस्य आहेत , उर्वरित १४ सदस्यांपैकी लोकसभेवर निवडून गेले आहेत असे वर्षा गायकवाड , निलेश लंके , प्रणिती शिंदे , बळवंत वानखेडे , प्रतिभा धानोरकर, रवींद्र वायकर आणि संदीपान भुमरे असे सात जण आहेत, तर राजू पारवे आणि अशोक चव्हाण या दोघांनी राजीनामा दिला आहे तसेच गोवर्धन शर्मा, राजेंद्र पाटणी, अनिल बाबर यांचे निधन झाले आहे आणि सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

अकरा जागांसाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची किमान २३ मते मिळणे आवश्यक आहे, सध्या पक्षीय बलाबल पाहता दोन्ही बाजूला विजयासाठी अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे.भाजपचे पाच, शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे दोन, काँग्रेसचा एक तसेच शिवसेना उबाठा एक आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठिंब्यावर शेकाप चे जयंत पाटील असे एकूण १२ उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत. सदस्यांची फोडफोड, खोक्यांचे आरोप प्रत्यारोप यानिमित्ताने पुन्हा एकदा उफाळून येणारं असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

ML/ML/SL

5 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *