राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक

 राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक

नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. Election for six Rajya Sabha seats in the state on February 27

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार असलेल्या अनिल देसाई शिवसेना (उबाठा), प्रकाश जावडेकर (भाजपा), कुमार केतकर (काँग्रेस), व्ही. मुरलीधरन , नारायण राणे( भाजपा ) आणि श्रीमती वंदना चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या सदस्यांचा कार्यकाळ 02 एप्रिल 2024 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक

ML/KA/PGB
29 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *