डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार

नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाकडून आज निवडणुकीच्या सुधारणा संदर्भात जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ ने सन्मानित करण्यात आले आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी मिशन युवा अभियान राबविले होते.
या अभियाना अंतर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन 75 हजार युवा मतदाराची नोंदणी करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये राबविले होते. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. देशभरातून चार पुरस्कारांसाठी 13 आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा या पुरस्कारात समावेश आहे.
ML/KA/SL
17 Jan. 2024