एकनाथ शिंदे यांना तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान

 एकनाथ शिंदे यांना तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान

पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी देहू संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त आज लाखो वारकरी देहूत दाखल झाले आहेत. आज सकाळी 11 च्या सुमारास वैकुंठ गमन सोहळा येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर फुले उधळण्यात आली. यावेळी लाखो वारकरी उपस्थित होते राम कृष्ण हरी च्या गजरात हा वैकुंठ गमन सोहळा संपन्न झाला.

तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार, चिपळ्या, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. शिंदे यांनी पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा- सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. हा सन्मान २५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता. आज जगद्गुरू तुकोबांचा ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे. दुपारी ठीक बारा वाजता कीर्तन झाल्यानंतर नांदूरकीच्या झाडावर वारकरी पुष्प अर्पण करताच हा सोहळा पार पडेल.

ML/ML/PGB
16 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *