अंध व्यक्तींसाठी आठवीतल्या विद्यार्थ्यांनी तयार केले स्मार्ट शूज

 अंध व्यक्तींसाठी आठवीतल्या विद्यार्थ्यांनी तयार केले स्मार्ट शूज

नांदेड, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय वयापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले की नवीन संशोधक निर्माण होतात. नांदेडमधील श्री गुरु गोबिंदसिंघजी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रज्ञा टेक स्पर्धेत भाग घेतलेल्या आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींचे आयुष्य सुलभ करणारे स्मार्ट शूज तयार केले आहेत. त्यांच्या या संशोधनाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. व्यंकटेश रुद्रावार आणि अथर्व जाधव अशी या बालसंशोधकांची नावे आहेत.

अंध व्यक्तीना ठेच लागू नये यासाठी इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी स्मार्ट शूज बनवलेत. अंध व्यक्तींना चालताना कुठल्याही अडथळ्याची पूर्वकल्पना मिळावी हा यामागचा उद्देश आहे. नांदेड शहरातील महात्मा फुले शाळेतील विद्यार्थ्यांनी ही स्मार्ट शूज तयार करण्याची कल्पना सुचली.

विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या स्मार्ट शूजमुळे अंध व्यक्तींच्या मार्गात कुठलाही अडथळा आला तर शूजमधून बझर वाजू लागतो. यामुळे अंध व्यक्तींना पूर्वकल्पना मिळते. अर्डीनो युनो अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि बझर यांचा उपयोग करून हे स्मार्ट शूज बनवन्यात आले आहेत. बुटाच्या समोरच्या बाजूस अल्ट्रासॉनिक सेन्सर लावण्यात आलाय.

हे सेन्सर अर्डीनो युनो आणि बझरशी जोडण्यात आले आहेत. यात अर्डीनो युनो एखाद्या मदर बोर्डप्रमाणे काम करते. बुटासमोर कुठलाही अडथळा आला तर अल्ट्रासॉनिक सेन्सर लगेच अर्डीनोयुनोला माहिती कळवते आणि अर्डीनो युनो बझरला कमांड देते.

सध्याच्या शूजमध्ये अर्डीनो युनो, अल्ट्रा सॉनिक सेन्सर आणि बझर ची साईज थोडी मोठी आहे. पण या तीनही वस्तू मायक्रो साईजमध्येही उपलब्ध आहेत. या वस्तू मायाक्रो साईजमध्ये करून त्या स्मार्ट शूजच्या आत कशा फिट होऊ शकतील यासाठी आम्ही विद्यार्थी प्रयत्न करत आहोत. हे स्मार्ट शूज लवकरच अंध व्यक्तींना वापरात आणता येऊ शकतील, असे विद्यार्थी व्यंकटेश रुद्रावार याने सांगितले.

SL/ML/SL

22 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *