आठ गिधाडं करणार ताडोबाच्या जंगलात मुक्तविहार

चंद्रपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील ताडोबाच्या जंगलात 8 गिधाडांना मुक्त करण्यात येणार आहे. रामायणातील महत्त्वाचं पात्र असलेल्या जटायू म्हणजेच गिधाड या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राममंदिर स्थापनेच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जानेवारीला ही गिधाडं ताडोबात सोडण्याची योजना आहे. गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने राज्यसरकारच्या वनविभागाने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.
राजस्थान येथून महाराष्ट्राला 15 गिधाडं मिळणार आहे. यातील 8 गिधाडं 21 जानेवारीला ताडोबाच्या झरी भागात मुक्त करण्यात येणार आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रामलल्ला मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने देशभरात होणाऱ्या कार्यक्रमांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्र परिषदेत दिली.
ML/KA/SL
15 Jan. 2024