बस कारच्या अपघातात माजी आमदारासह आठ जण जखमी
अकोला दि ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील काटेपूर्णा नजिक कार आणि बसच्या अपघातात बुलडाणा येथील माजी आमदार विजय शिंदे यांच्यासह अन्य चार जण जखमी झाले आणि बसमधील चार जण असे एकूण आठ जण जखमी झाले आहेत.
ही घटना आज दुपारी घडली. सुदैवाने मोठी हानी टळली, बुलडाण्याचे माजी आमदार विजय शिंदे हे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह आपल्या कार मधून अकोल्या कडून मुर्तिजापूर कडे जात होते, याचदरम्यान कारंजा आगारातील बस कारंजा ते अकोला येथे जात होती.
घटनेची माहिती मिळताच काटेपूर्णा येथील माॅ चंडिका माता आपत्कालीन व्यवस्थापन सदस्यांनी तात्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
ML/KA/SL
7 Oct. 2023