राज्यात मोठे उद्योग येण्यासाठी वॉर रूम मार्फत प्रयत्न

 राज्यात मोठे उद्योग येण्यासाठी वॉर रूम मार्फत प्रयत्न

नागपूर दि १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्य सरकार हे उद्योगांना चालना देण्यावर , प्रलंबित प्रकल्पांना पुढे घेऊन जाण्यावर भर देत आहे. प्रत्येक प्रकल्पाचे वॉररुमच्या माध्यमातून निरिक्षण आणि आढावा घेतला जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. Efforts through war room to bring big industries in the state : CM Shinde

राज्यात उद्योग निर्मिती होईल , मोठे उद्योगआम्ही देऊ. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नेतृत्वात राज्यातील 225 विकास प्रकल्पांसाठी 2 लाख कोटी रुपये मान्य झाले आहेत. हे सरकार विकासाभमुख असून राज्याच्या सर्वांगीण विकासाकरीता कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

विदर्भाचा महत्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी एकनाथ शिंदे आज करणार आहेत. त्यासोबतच भंडारा जिल्ह्यात आयोजित विविध उद्घाटन, लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण होईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. खासदार गजानन कीर्तिकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला निश्चित होईल , राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेच्या संदर्भात विचारले असता या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नसून पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही केली आहे, असे त्यांनी सांगितले.

ML/KA/SL

12 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *