उष्णतेच्या लाटेचा शेअर बाजारावर (Stock Market) परिणाम

 उष्णतेच्या लाटेचा शेअर बाजारावर (Stock Market) परिणाम

मुंबई, दि. २० (जितेश सावंत) : घाऊक महागाईत मोठी घसरण झाल्याने आठवड्याची सुरुवात सकारात्मकतेने झाली.(WPI) महागाई जुलै 2020 नंतर प्रथमच नकारात्मक क्षेत्रात घसरल्याने सेंटीमेंट सुधारले. परंतु नफावसुली व यूएस मधील कर्ज मर्यादा संकटाच्या चिंतेमुळे पुढचे तीन दिवस बाजारात घसरण झाली.पण आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला.

FII ची खरेदी व काही कंपन्यांचे उत्तम तिमाही निकाल यामुळे आठवड्याचा तोटा कमी करण्यात शेवटच्या दिवशी यश मिळाले.तरी सुद्धा बाजाराने तीन आठवड्याची बढत गमावली.

शुक्रवारी 19 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली.
उष्णतेच्या लाटेचा शेअर बाजारावर परिणाम. Heat Wave Impact On Stock Market
असे म्हणतात सामान्य उन्हाळ्याचा इक्विटी मार्केटवर फारसा परिणाम होत नसला तरी, उष्णतेच्या लाटा पुन्हा येण्याने स्टॉक मार्केटवर परिणाम होऊ शकतो.

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने (IMD) जारी केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिना भारतात गेल्या 146 वर्षांतील सर्वात उष्ण महिना होता. ही पहिलीच वेळ नाही. उदाहरणार्थ, 2022 मध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची सरासरी संख्या एका दशकात सर्वाधिक झाली होती.

2023 च्या पहिल्या सलग तीन महिन्यांत निर्देशकांनी नकारात्मक परतावा दिला.बाजाराच्या अशा खराब कामगिरीला विविध घटक कारणीभूत होते.त्यातील महत्वाचा घटक म्हणजे बँकिंग संकट (banking crisis)
भारतीय शेअर बाजारातील घसरण केवळ जागतिक घटकांमुळेच नाही तर स्थानिक घटकांनीही यासाठी भूमिका बजावली.

फेब्रुवारी महिन्यातील उष्णता हे एक महत्वाचे कारण आहे. भारतात अनेक भागात ह्या वर्षी नेहमीपेक्षा जास्त उष्णतेचे प्रमाण अनुभवास मिळाले. ह्याच्या परिणाम केवळ मनुष्यजीवनावर होणार नसून अर्थव्यवस्थेच्या वाढीवर देखील परिणाम होणार आहे. करोनाचे परिणाम व लाट ओसरल्यानंतरच्या परिणामातून हळूहळू भारत सावरत आहे. परंतु तापमान वाढीच्या संकटाचा परिणाम अर्थव्यवस्था व पर्यायाने जी.डी.पी (GDP)वर होताना दिसेल. त्यातच भारतीय हवामान विभागाने (IMD) EL-Ninoचा इशारा दिला आहे.

आयएमडीने म्हटले आहे की या मान्सूनमध्ये अल निनो विकसित होण्याची 70 टक्के शक्यता आहे. जर हे खरे ठरले तर त्याचा देशाच्या खरीप उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
Technical view on nifty-बाजार ओव्हरबॉट झोन मध्ये आहे. शुक्रवारी निफ्टीने 18203 चा बंद भाव दिला.वरच्या स्तरावर निफ्टी 18273-18287-18309 हे टप्पे गाठू शकेल पण बाजार ओव्हरबॉट असल्याने वरच्या स्तरावर नफावसुली होईल.

निफ्टीसाठी 18055-18000 हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल व निफ्टी 17931-17885-17842-17828 हे स्तर गाठेल.
महागाईतील घसरणीमुळे सेन्सेक्स 318 अंकांनी वधारला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सपाट सुरूवातीनंतर बाजाराने गती घेतली. घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाई जुलै 2020 नंतर प्रथमच नकारात्मक क्षेत्रात घसरल्याने सेंटीमेंट सुधारले. किरकोळ महागाईनंतर घाऊक महागाईतही मोठी घसरण झाली. महागाई एप्रिलमध्ये उणे 0.92 टक्क्यांच्या 34 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.(WPI inflation for April falls to -0.92%, lowest in 34 months)यामुळे सलग दुसऱ्या सत्रात बाजाराने उच्चांक गाठला,रिअलिटी इंडेक्समध्ये सर्वाधिक चार टक्क्यांची उसळी दिसून आली.

त्याचप्रमाणे FMCG आणि PSU बँक निर्देशांकांमध्ये 1-1 टक्के वाढ झाली.सेन्सेक्स जवळपास 450 अंकांनी वधारला.निर्देशकांनी 5 महिन्याचा उचांक गाठला.दिवसभराच्याअखेरीससेन्सेक्स317.81 अंकांनी वधारून 62,345.71वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 84 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,398.80 चा बंद दिला.Sensex gains 318 pts as investors cheer dip in inflation
दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक.

सेन्सेक्स 413 अंकांनी घसरला मंगळवारी
सलग दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला.
सकारात्मक जागतिक संकेत असूनही आज सपाट नोटवर सुरू झाला आणि काही तास एका विशिष्ठ पातळीत फिरत राहिला. त्यानंतर दुपारच्या सत्रात विक्रीचा दबाव निर्माण झाला त्यामुळे बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स413.24 अंकांनी घसरून 61,932.47 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 112.30 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,286.50 चा बंद दिला. Sensex sheds 413 pts

सलग दुसऱ्या दिवशी बाजारात नफावसुली
बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात नफावसुली पाहावयास मिळालाय. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत व यूएस मधील कर्ज मर्यादा संकटाच्या चिंतेचा भारतीय बाजारावर होताना दिसला. नकारात्मक सुरुवातीनंतर, बाजारात जोरदार नफावसुली झाली.सर्व क्षेत्रांमध्ये विक्री झाली यामुळे निफ्टीने 18,100 च्या जवळचा स्तर गाठला.सलग दोन दिवसांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 371.83 अंकांनी घसरून 61,560.64 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 104.70 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,181.80 चा बंद दिला. Sensex ends 372 pts lower

सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स घसरला
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली. परंतु सुरुवातीची बढत कायम ठेवण्यात बाजार अपयशी ठरला व सलग तिसऱ्या दिवशी घसरणीने बंद झाला.सर्व क्षेत्रांमध्ये आणि हेवीवेट समभागात झालेल्या प्रॉफिट बुकिंगमुळे बाजार पडला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 129 अंकांनी घसरून 61,431.74 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 52अंकांची घट होऊन निफ्टीने 18,130 चा बंद दिला. Sensex ends lower for third straight day
सेन्सेक्स 298 अंकांनी वधारला.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकारात्मक सुरुवातीनंतर बाजार एका विशिष्ठ पातळीभोवती फिरत राहिला परंतु शेवटच्या तासातील खरेदीमुळे बाजार दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे तीन दिवसांच्या विक्रीला आळा बसला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 298 अंकांनी वधारून 61,729.68 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 73.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,203.40 चा बंद दिला. Sensex up 298 points

(लेखक शेअरबाजारतज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)
jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *