इडन गार्डन स्टेडीयमची भिंत कोसळली, उद्याच्या सामन्याबाबत संभ्रम
कोलकाता, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सामन्यांच्या नियोजनामध्ये तृटी राहत असल्याने आणि प्रेक्षकांना तिकिटे मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून BCCI ला मोठ्या प्रमाणावर टिकेला सामोरे जावे लागत आहे.त्यातच आता कोलकाता येथील इडन गार्डन क्रिकेट स्टेडीयमची भिंत कोसळल्याने विश्वचषक सामन्यांच्या आयोजनावर परिणाम होणार आहे. उद्या इडन गार्डनवर होणाऱ्या बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यातील नियोजित सामना रद्द होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भिंतीच्या दुरुस्तीचं काम सध्या हाती घेण्यात आलं असून काम पूर्ण झाल्यानंतरच उद्याच्या सामन्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर शनिवारी म्हणजेच उद्या बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयकडून स्टेडियममध्ये सजावटीचं काम हाती घेण्यात आलं आहे. यामध्ये अर्थ मुव्हिंग मशिनचा धक्का लागल्याने स्टेडियममधील एक भिंत पडली आहे. त्यामुळं वीटा, वाळू आणि सिमेंटचा मोठा थर निर्माण झाला आहे. त्यानंतर आता पडलेल्या भिंतीचा मलबा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून तातडीने नवी भिंत उभारण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे.
SL/KA/SL
27 Oct. 2023