एडलवाईजच्या संचालकांना बजावली रायगड पोलिसांनी नाेटीस

 एडलवाईजच्या संचालकांना बजावली रायगड पोलिसांनी नाेटीस

अलिबाग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी एडलवाईस फायनान्सच्या पाच अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला; नितीन देसाई विधवेवर आधारित आयपीसी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि आयपीसी 34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकांना रायगड पोलिसांनी नाेटीस पाठवली आहे. विविध मुद्द्यांवर संचालकांकडून माहिती मागवण्यात आली आहे. आठ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत खालापूर पाेलिस ठाण्यात हजर राहून माहिती सादर करण्याचे फर्मान पाेलीसांनी दिले आहे. त्यामुळे आता या सीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकां विरोधात पाेलीसांचा फास आवळला आहे.

नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबत तक्रार दिली होती. आतापर्यंत पोलिसांनी 15 साक्षीदारांकडे विचारपूस केली आहे. तसेच, एनडी स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, अकाउंटन्ट आणि आर्थिक सल्लागार यांच्याकडून कर्ज प्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे.

दरम्यान, गुन्ह्याच्या तपासासाठी उपविभागीय पाेलीस अधिकारी, एक पाेलीस निरीक्षक, तीन सहा पाेलीस निरीक्षक आणि चार पाेलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले आहे.Edelweiss director issued notice by Raigad police

ML/KA/PGB
6 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *