ED ने जप्त केली जेट एअरवेजच्या संस्थांपकांची कोट्यवधींची मालमत्ता
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॅनेरा बँक घोटाळा प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोय गोयल यांची 538 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गोयल सध्या कारागृहात आहेत. या कारवाईमुळे अनेक घोटाळेबाजांना चाप बसणार आहे.
ईडीने याप्रकरणात त्यांची 538 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वी ईडीने 31 ऑक्टोबर रोजी नरेश गोयल यांच्यासह इतर आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. कॅनेरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात नरेश गोयल यांना 1 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
ईडीने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड विरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियम (PMLA) 2002 मधील विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत 538 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये अनेक कंपन्या आणि व्यक्तींच्या मालमत्तांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये 17 रहिवाशी फ्लॅट, बंगले आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.
ईडीने या प्रकरणात गोयल यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांना पण आरोपी केले आहे.कॅनरा बँकेने जेट एअरवेजला 848.86 कर्ज मंजूर केले होते. त्यातील 538.62 कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. त्यातूनच त्यांना अटक झाली.
SL/KA/SL
1 Nov. 2023