बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीचे छापे

 बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीचे छापे

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले आहेत. रोहित पवारांच्या कंपनीसह एकूण सहा ठिकाणी आज सकाळपासून ईडीचे अधिकारी झडती घेत आहेत.

दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. तपास सुरू झाल्यानंतर बारामती अ‍ॅग्रोवर छापा पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. रोहित पवार यांना मागील वर्षी या संदर्भातील नोटीस बजावण्यात आली होती. आजच्या छाप्यांवर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या प्रकरणात मुंबई पोलीस आणि ईडी ७० हून अधिक राजकीय नेत्यांची चौकशी करत आहे. त्यात राष्ट्रवादीचे ५०, काँग्रेसचे नऊ, शिवसेनेचे दोन आणि भाजपच्या एका नेत्याचा समावेश आहे. घोटाळ्याशी संबंधित एफआयआरमध्ये अजित पवार हे देखील आरोपी आहेत. शरद पवार यांचं नाव यात नाही. २०१९ च्या निवडणुकीच्या दरम्यान ईडीनं शरद पवार यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. त्यामुळं या प्रकरणाला विशेष महत्त्व आहे.

ही आहे पार्श्वभूमी

औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्यानं राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून २०१२ साली ५० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कालांतरानं या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. हा कारखाना बारामती अ‍ॅग्रो प्रा. लि. कंपनीनं खरेदी केला. बारामती अॅग्रोबरोबरच हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. व अन्य एका कंपनीनं लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता. बँक खात्याच्या छाननीत असं आढळून आलं की बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं २५ ऑगस्ट २०२२ रोजी हायटेक इंजिनीअरिंगला ५ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी हायटेक इंजिनीअरिंगनं लिलावात भाग घेतला.

SL/KA/SL

5 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *