BYJU’Sच्या कार्यालयांवर EDचे छापे

बंगळुरू,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : BYJU’S या 2011 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय बहुराष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीने भारतीय बाजारपेठेत चांगला दम बसवला असतानाच आता लेखापरिक्षणातील तृटींमुळे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) BYJY’S वर कारवाई केली आहे. आज बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांच्या बंगळुरूतील तीन ठिकाणी ईडीने धाड टाकली आहे. ही कारवाई फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) च्या तरतुदींनुसार केली आहे. बायजू रवींद्रन आणि त्यांची कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवर छापे टाकण्यात आले आहेत.
अधिकार्यांनी झडतीदरम्यान आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त केला आहे. कंपनीला 2011 ते 2023 दरम्यान 28,000 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. याशिवाय कंपनीने एफडीआयच्या नावाने विविध देशांना पैसेही पाठवले.ईडीच्या म्हणण्यानुसार, Byju’s नावाने एडटेक प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या Think and Learn Pvt Ltd ने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावाखाली सुमारे 944 कोटी रुपये खर्च केले होते. कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 पासून आपले आर्थिक विवरण तयार केले नाही आणि खात्यांचे लेखापरीक्षण केले नाही. त्यामुळे त्याचा तपास सुरू आहे.
दरम्यान मार्च 2022 पर्यंत, Byju चे मूल्य US$22 अब्ज आहे. एप्रिल 2023 पर्यंत, कंपनीने 150 दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे
SL/KA/Sl
29 April 2023