हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा ई डी च्या धाडी

कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले असून त्यांनी पुन्हा तपासणी सुरू केली आहे.
मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे.ED raids again on Hasan Mushrif
पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत.
सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचं वृत्त होतं.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.
त्याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
दीड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाईमुळे
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
कागल मध्ये वातावरण तणावपूर्ण बनले आहे .
शुक्रवारी उच्च न्यायालयानं हसन मुश्रीफ यांना अटकेपासून दिलासा दिला होता मात्र आज लगेच ही कारवाई झाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते.
ML/KA/PGB
11 Mar. 2023