ईडीने जप्त केले, आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांचे २७ कोटींचे शेअर्स

 ईडीने जप्त केले, आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांचे २७ कोटींचे शेअर्स

हैदराबाद, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क):

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या हैदराबाद युनिटने जगन मोहन रेड्डी यांचे २७.५ कोटी रुपयांचे शेअर्स तात्पुरते जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. १४ वर्षांपूर्वीच्या जुन्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. हे संपूर्ण प्रकरण ‘क्विड प्रो क्वो’ गुंतवणुकीच्या संदर्भातील असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.ईडीने केलेल्या या कारवाईत जगन मोहन रेड्डी यांचे तीन कंपन्यांमधील २७.५ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले आहेत. आहे.

जगन मोहन रेड्डी यांचे शेअर्स जप्त करण्याच्या कारवाई बरोबरच ईडीने त्याच प्रकरणात दालमिया सिमेंट्स (भारत) लिमिटेडच्या (डीसीबीएल) मालकीची ३७७.२ कोटी रुपयांची जमीन देखील जप्त केली आहे. ही जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी रुपयांची असल्याचं डीसीबीएलने म्हटलं आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *