२० लाख रूपयांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक

चेन्नई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
देशभर ईडीच्या धाडींची दहशत असताना आता कुंपणानेच शेत खाल्ल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकाऱ्याने लाच घेतल्याची घटना ताजी असतानाच आता तमिळनाडूमधुनही एका ईडीमध्ये कार्यरत अधिकाऱ्याला लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि दक्षता पथकाने (DVAC)) शुक्रवारी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली.अँटी करप्शन टीमच्या म्हणण्यानुसार, ईडीच्या अधिकाऱ्याने एका सरकारी डॉक्टरला जुन्या प्रकरणात धमकावून 51 लाख रुपयांची लाच मागितली. डॉक्टरांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये दिले.नंतर आरोपीने डॉक्टरांना सांगितले की, त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून आले आहेत. अंकित तिवारी असे अटक केलेल्या ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे.
अँटी करप्शन अँड व्हिजिलन्स टीम (DVAC) नुसार, अंकित तिवारी मदुराई ईडी कार्यालयात तैनात आहे. 29 ऑक्टोबर रोजी अंकितने दिंडीगुल येथील एका सरकारी डॉक्टरशी संपर्क साधला आणि सांगितले की, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र हे प्रकरण आधीच निकाली काढण्यात आले आहे.
डॉक्टरांना घाबरवताना अंकितने असेही सांगितले होते की, ईडीला पीएम ऑफिसकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मिळाले आहेत. यानंतर डॉक्टरांना 30 ऑक्टोबर रोजी मदुराई येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले.
अंकितचे बोलणे ऐकून डॉक्टर खूप घाबरले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ईडी कार्यालयात पोहोचला तेव्हा अंकित तिवारी डॉक्टरांच्या गाडीत घुसला आणि म्हणाला की या प्रकरणात कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपल्याला 3 कोटी रुपये द्यावे लागतील. त्यानंतर डॉक्टर तेथून निघून गेले. यानंतर अंकितने डॉक्टरांना सांगितले की, आपण आपल्या वरिष्ठांशी बोललो आणि त्यांनी 51 लाख रुपये लाच घेण्याचे मान्य केले. 1 नोव्हेंबर रोजी डॉक्टरने लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये अंकितला दिले.20 लाख रुपये घेतल्यानंतर अंकितने डॉक्टरांना फोन करून संपूर्ण 51 लाख रुपये लवकर द्यावे अन्यथा मोठी कारवाई केली जाईल, असे मेसेज पाठवून धमकी दिली.
दरम्यान, डॉक्टरांना अंकितच्या हालचालींवर संशय आला आणि त्यांनी दिंडीगुल अँटी करप्शन अँड व्हिजिलन्स टीम (DVAC) कार्यालयात 30 नोव्हेंबर रोजी तक्रार केली.
1 नोव्हेंबर रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी अंकित तिवारीला तक्रारदाराकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडले. यानंतर त्याला सकाळी 10.30 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली. अंकितला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
SL/KA/SL
2 Dec. 2023