मुश्रीफ प्रकरणी ED बँकेत दाखल:तपासणी सुरू

 मुश्रीफ प्रकरणी ED बँकेत दाखल:तपासणी सुरू

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर आज सकाळी ‘ईडी’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. ED filed in bank in Mushrif case: investigation underway

सेनापती कापशी इथल्या जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरू आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी इथला साखर कारखाना आणि त्यांच्या मुलीच्या घरी ११ जानेवारी रोजी ‘ईडी’नं छापे टाकले होते.

यामध्ये काय सापडलं, याची माहिती समजू शकली नाही. मात्र गेले वीस दिवस हे वादळ शांत झालेलं नाही, याची चर्चा कागल मतदारसंघात सुरु होती.

आज सकाळी अकरा वाजता ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेच्या शाहुपुरी मुख्यकार्यालयात पोहचले आहेत. त्यांनी तपासणी सुरू केली असून ईडीचे अधिकारी आल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते.

ML/KA/PGB
1 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *