या मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई

 या मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हिवो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर (Vivo Mobile) या मोबाईल कंपनीवर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. बड्या अधिकाऱ्यांसह ईडीने चौघांना अटक केली आहे. यामध्ये लावा इंटरनॅशनल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाचा समावेश आहे. लावा इंटरनॅशनल (Lava International) ही कंपनी भारतीय मोबाईल कंपनी आहे.तर व्हिवो ही मूळची चिनी कंपनी आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने आरोप केला आहे की व्हिवो मोबाईल कंपनीने भारतात कर भरावा लागू नये यासाठी अवैध मार्गाने चीनला 62,476 कोटी रुपयांची मोठी रक्कम पाठवली आहे. ईडीने व्हिवो कंपनीशी संबंधित 23 कंपन्यांच्या 48 ठिकाणी छापे टाकून 119 बँक खात्यांमधून 465 कोटी रुपये जप्त केले होते. यामध्ये 73 लाख रुपये रोख आणि 2 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी नागरीक अॅण्ड्र्यू कुआंग, लावा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय आणि राजन मलिक आणि नितीन गर्ग या चार्टर्ड अकाउंटट यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने जवळपास एक वर्षापूर्वी व्हिवो मोबाईल कंपनीवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने मागील वर्षी व्हिवो मोबाईलशी संबंधित 48 ठिकाणांवर छापेमारी केली होती. या दरम्यान, कंपनीशी संबंधित असलेल्या 23 कंपन्यांच्या व्यवहाराची चौकशी केली होती.व्हिवो मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 1 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आली होती. ग्रँड प्रॉस्पेक्ट इंटरनॅशनल कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी व्हिवोशी संबंधित आहे. ही कंपनी स्थापन करताना अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरणी या कंपनीची चौकशी सुरू आहे.

SL/KA/SL

10 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *