एका रुपयाच्या खर्चात साकारला सुपारेश्वर इको फ्रेंडली गणेशा.

 एका रुपयाच्या खर्चात साकारला सुपारेश्वर इको फ्रेंडली गणेशा.

छ संभाजीनगर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सध्या सर्वत्र विविध प्रदूषणामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक जण काम करीत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील डॉ संतोष पाटील यांनी अवघ्या एका रुपयाचा खर्च करून सुपारी पासून सुपारेश्र्वर इको फ्रेंडली गणेशा साकारला आहे. या गणेशा च्या सजावटीसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे.

पूजेच्या सुपारीला गणपती मानले जाते.याच सुपारी ची नारळात स्थापना करून हा गणेश साकारला आहे. “सुपारेश्वर”.सुपारी आणि नारळ हे कोकण चे वैभव आहे. सजावटी मध्ये पिंपळाच्या 8 पानांचा अष्टविनायक म्हणून वापर करून गणेशाची अप्रतिम हरित प्रतिमा साकारली आहे.

लाकडी फळं आणि पेपर चा उपयोग करून फुलमाळा ,वनस्पतीच्या पानांपासून बनवलेल्या रंग तसेच तांदूळ, चूर्ण यापासून नैसर्गिक हिरवा रंग, हळद, बिट पावडर पासून लाल रंगांची रांगोळी साकारली आहे .श्री गणेशास प्रिय असलेले तेरडा तथा गौरी पुष्प, आणि पुरातन काळी लिखाण काम तथा शिक्षणासाठी लागणारी निळी शाई ज्या वनस्पती पासून बनते ती दुर्मीळ निळ (शारदा) ही वनस्पती गणपती शेजारी ठेवून गणपती ही विद्येची देवता आहे हे अधोरेखित केले आहे.

पूजेत दुर्मिळ झालेले “देशी झिनी” तांदूळ वापरले असून दुर्मिळ तांदळाचे संवर्धनाचा संदेश दिला आहे. प्लास्टिकचा कुठे ही वापर करण्यात आला नाही. पारंपरिक वाद्य सनई वाजवणारी लाकडापासून निर्मित गायिका स्वागतास उभी आहे.धूप म्हणून अजिंठा डोंगरतील सलई गुग्गुळ वापरण्यात आली आहे. या सुपारेश्वराचे घरीच कुंडीत विसर्जन करण्यात येणार असून त्याचे मातीतच आपोआप 40 दिवसात विघटन होईल असे डॉ.संतोष पाटील यांनी सांगितले.

ML/ML/PGB 8 sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *