मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस
नवी दिल्ली, दि. ५ : अर्जुन पुरस्कार विजेता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून सहा दिवसांच्या आत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या आणि भावाच्या मतदार नोंदणी फॉर्ममध्ये विसंगती आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शमीचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे झाला असला तरी त्याचे नाव सध्या कोलकाता नगर निगमच्या वार्ड क्रमांक ९३ मध्ये मतदार म्हणून नोंदलेले आहेत. या नोंदणीतील त्रुटीमुळे आयोगाने विशेष गहन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत नोटीस जारी केली आहे.
मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाला सुरुवातीला दक्षिण कोलकात्याच्या जाधवपूर परिसरातील कार्टजू नगर शाळेत सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) यांच्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु राजकोटमध्ये पश्चिम बंगालसाठी होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात व्यस्त असल्याने शमी उपस्थित राहू शकला नाही.
आता त्यांना सहायक निर्वाचक पंजीकरण अधिकारी (AERO) समोर सहा दिवसांत हजर राहून स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. या सुनावणीदरम्यान त्यांच्या मतदार नोंदणीतील त्रुटींची तपासणी होणार असून आयोगाकडून पुढील कारवाई निश्चित केली जाईल. यावेळी कोणत्याही परिस्थितीत मोहम्मद शमीला उपस्थित राहावे लागणार आहे, जर शमी यावेळी उपस्थित राहीला नाही तर त्याच्यार मोठी कारवाई केली जाऊ शकते.