गरमगरम सासव खा
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आंब्यांचा रस काढून घ्यावा.त्यांच्या बाठी टाकू नये. चमच्यानी रस सारखा करून घ्यावा.रसाच्या गाठी मोडून घ्याव्या.अर्धा ते पाऊण चमचा मोहरी कढईमधे कोरडी भाजावी.ओले खोबरे आणि भाजलेली मोहरी पाणी घालून वाटावी. आंब्याच्या रसात तिखट,हळद अणि गूळ घालावे.मीठ घालून हे वाटण घालावे.बाजूला काढून ठेवलेले बाठे त्या मिश्रणात घालाव्या.गॅसवर ठेऊन एक उकळी काढावी. एक मोठा चमचा पाणी घालून मिश्रण सारखे करावे.
गरमगरम सासव खायला तयार.
वाढणी/प्रमाण:
३-४
अधिक टिपा:
१.याची कन्सिस्टन्सी रायत्याप्रमाणे असावी.
२. हवे असल्यास किंवा काही घरांतून हिंग मोहरीच्या फोडणीवर वरील मिश्रण घालतात.आई घालत नाही.त्यामुळे मीही घातले नाही.
३.पोळी/ भाकरीबरोबर खाऊ शकता.गेल्याच आठवड्यात माझ्या शेजारणीने भातावर घेऊन खाल्ले.
ML/ML/PGB 24 Aug 2024