मुंबईत रामलीला आयोजनाचा मार्ग सुकर

मुंबई दि.9( एम एमसी न्यूज नेटवर्क) : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने मुंबईत रामलीला आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दसरा आणि नवरात्रोत्सव काळात मुंबईसह परिसरात रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली रामलीला कार्यक्रमाचे मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र रामलीला मंडळाच्या प्रतिनिधींसोबत लोढा यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत मुंबईत रामलीलाच्या आयोजनावेळी आजवर आलेल्या अडचणींवर तोडगा काढत असताना मुंबई महापालिकेला त्यांनी काही निर्देश दिले होते. ज्याची आता पूर्तता करण्यात आली आहे.
त्या निर्देशानुसार, मुंबई आणि उपनगरात आयोजित करण्यात आलेल्या रामलीला कार्यक्रमासाठी एक खिडकी योजना तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मैदानाच्या भाड्यामध्ये ५० % सवलत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला . रामलीला कार्यक्रमाच्या परिसरात स्वच्छतेसाठी मोबाईल टॉयलेटसारख्या विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, अग्निशमन दलाचे शुल्क पूर्णपणे माफ करून अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे. . याबाबत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक काढण्यात आले असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
ML/KA/SL
9 Oct. 2023