सोपी रेसिपी, डाळ कांदा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. तासभर भिजवलेली १/२ वाटी तुरडाळ
२. पोह्यांसाठी चिरतो तसा लांब चिरलेला १ मोठा कांदा
३. ३ हिरव्या मिरच्या
४. ४ लसुण पाकळ्या बारिक चिरलेल्या
५. थोडसं किसलेल अद्रक
६. मोहरी, जिरं, तेल, तिखट, मिठ, हळद, एव्हरेस्ट चिकन मसाला
७. सांभार / कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
* तेल तापल्यावर त्यात मोहरी जिर्याची फोड्णी द्यावी. मग त्यात कांदा + मिरची + लसुण + अद्रक टाकावे.
* कांदा लालसर झाल्यावर त्यात पाऊण चमचा तिखट + मिठ + हळद टाकावे.
* सर्व परतवल्यावर त्यात डाळ टाकावी.. पाऊण वाटी पाणी टाकुन त्यावर झा़कण ठेवावे.
* शेवटी गॅस बंद करुन पाव चमचा चिकन मसाला आणि सांभार टाकून जरा वेळ भाजी झाकुन ठेवावी.
Easy recipe, dal kanda
ML/ML/PGB
20 April 2024