पश्र्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

 पश्र्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

पश्र्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी सात च्या सुमारास पश्र्चिम विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे धक्के बसले असून त्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच मालमत्तेचे ही नुकसान झालेले नाही.

मराठवाड्यात नांदेड शहराला सौम्य भूकंपाचा धक्का बसला. नांदेड शहरातील विवेकानगर, कैलास नगर तसेच ईतर भागातून नागरिक घराबाहेर मोकळ्या ठिकाणी आले. भूकंपाची तीव्रता कळाली नाही. भूकंपाचे केंद्र
नांदेड आणि हिंगोली जिल्हयाच्या मध्यभागी असणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर हे गांव असल्याची प्राथमिक माहिती आहे, अजून कुठलीही अधिकृत माहिती नाही.

संभाजीनगर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले
पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले, हिंगोली जिल्ह्यात भूगर्भातून आवाज आणि सौम्य धक्का जाणवला आहे. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 4.5 अशी झाली आहे. घेतलेल्या माहिती नुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

परभणी जिल्ह्यात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यामुळे घरावरील पत्रे हल्ल्याचा आणि जमिनीतून आवाज येत होता. सकाळी झालेल्या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.अशाच मागील चार महिन्यांपूर्वी भूकंप झाला होता.त्याच परिसरात आजचा केंद्र बिंदू असल्याचे दाखवत आहे .

पश्र्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील ग्राम रुई गोस्ता येथे सकाळी 7.20 ते 7.25 या दरम्यान सौम्य असा भूकम्पाचा धक्का जाणवला. जालन्यात अंबड तालुक्यातील दुधपुरी गावात आज सकाळच्या सुमारास जाणवले सौम्य भुकंपाचे धक्के बसले
भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

जालना तालुक्यातील भाटेपुरी, मंठा तालुक्यातील काही गावांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. आज सकाळी 7:10 ते 7:15 वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अंबड तालुक्यातील शेवगा, वागलखेडा, अलामगव, माहेर भायगाव तर घनसावंगी तालुक्यातील खालापूरी, तिर्थपुरी, बानेगाव, रामसगाव गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. Earthquake tremors in western Vidarbha and Marathwada

ML/ML/PGB
10 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *