चंद्रपूर- गडचिरोलीसह दक्षिण भारतात जाणवले भूकंपाचे धक्के
चंद्रपूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर- गडचिरोलीसह दक्षिण भारतात आज सकाळी 7.23 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार हा भूकंप रीक्टर स्केलवर 5.3 एवढ्या मोठ्या क्षमतेचा असल्याची पुष्टी झाली आहे. संपूर्ण गोदावरी नदी खो-यात कमी-अधिक प्रमाणात असे धक्के जाणवले आहेत. तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
या दशकातला हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप असल्याची माहिती पुढे आली असून गोदावरी फॉल्टमुळे हा भूकंप झाला असल्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हे धक्के जाणवले तर चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण भागात सौम्य धक्के जाणवले आहेत.नागपूर येथे ही हे धक्के जाणवले.
ML/ML/SL
4 Dec. 2024