पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

 पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर दि २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , दापचरी परिसरात शनिवारी संध्यकाळी भूकंपाचे दोन धक्के बसले. शनिवारी ५ वाजून १५ मिनिटांनी ३.३ रिस्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू भूगर्भात ८ किलोमीटर खोलवर होता. त्यानंतर पुन्हा ५ वाजून २८ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू भूगर्भात ५ किलोमिटर खोलवर होता.

जिल्ह्यात पुन्हा या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे इथल्या नागरीकांना सतत या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मात्र अजून देखील २०१८ पासून डहाणू आणि आसासच्या परिसरात हे भूकंपाचे धक्के का बसत आहेत याचं कारण प्रशासन शोधू शकलेलं नाही.

ML/KA/SL

27 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *